'मला डिस्टर्ब करू नका, तुमचं मंत्रिपद...! अजित पवारांनी विधिमंडाळत दिला 'या' नेत्याला दम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

'मला डिस्टर्ब करू नका, तुमचं मंत्रिपद...! अजित पवारांनी विधिमंडाळत दिला 'या' नेत्याला दम

तब्बल दोन वर्षानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. सुरुवातीला अधिवेशन आरोप-प्रत्यारोप आणि चौकशांनी गाजलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं.

हेही वाचा: Political News: नेटकरी म्हणतात, फडणवीसांच्या शाळेत पवार हेडमास्तर; एका दगडात ४ पक्षी जाळ्यात

मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. मात्रा एकनाथ शिंदे यांचे भाषण संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना सुनावले.

अजित पवार म्हणाले की, "एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात नकोत्या मुद्द्यावर तुम्ही बोलू नका, राज्याच्या हिताच्या गोष्टींवर बोला बाकीच्या गोष्टींवर बोलायला तुमचे प्रवक्ते दिपक केसरकर आहेत ना? तुमच्यात आणि शिवसेनेत काय झालं हे राज्याला काय करायचं आहे.

हेही वाचा: जयंत पाटलांचाच झाला करेक्ट कार्यक्रम; शिंदे-फडणवीसांनी दिले चौकशी आदेश

अजित पवारांचं भाषण चालू असताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले मधे मधे व्यत्यय आणत होते. त्यावर अजित पवार चिडले आणि म्हणाले तुम्ही मला डिस्टर्ब करू नका नाही तर तुम्हाला माहिती नाही का माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध किती जवळचे आहेत.

माझ्या भाषणात जेवढ्या अडचणी निर्माण कराल, तेवढं तुमचं मंत्रिपद दूर जाईल असा सज्जड दमच गोगावले यांना भरला. त्यानंतर सभागृहात चांगलाच मात्र हशा पिकाला.

हेही वाचा-जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक