राज्यात आणखी ४६ लर्निंग डिसॲबिलिटी क्‍लिनिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर - ‘सकाळ पेंडॉल’मधून वाचा फोडलेल्या जनहिताच्या प्रश्‍नांवर सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील सोहम संस्थेने दिलेला ‘लर्निंग डिसॲबिलिटी क्‍लिनिक’चा प्रश्‍न ‘सकाळ पेंडॉल’मधून मांडला. त्यावर राज्यभरात आणखी ४६ क्‍लिनिक उभारण्यात येतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला.    

नागपूर - ‘सकाळ पेंडॉल’मधून वाचा फोडलेल्या जनहिताच्या प्रश्‍नांवर सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील सोहम संस्थेने दिलेला ‘लर्निंग डिसॲबिलिटी क्‍लिनिक’चा प्रश्‍न ‘सकाळ पेंडॉल’मधून मांडला. त्यावर राज्यभरात आणखी ४६ क्‍लिनिक उभारण्यात येतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला.    

गतिमंदता किंवा अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन अक्षमतेबद्दल उपचाराचे मुंबई येथे तीन, तर पुणे येथे एक क्‍लिनिक उपलब्ध होते. त्यामुळे अक्षमता असलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मुंबई आणि पुण्याचे खेटे मारावे लागायचे. त्यामुळे अक्षमता असलेली ६० टक्‍क्‍यांहून अधिक बालके शिक्षणापासून वंचित राहायची. या निर्णयामुळे सर्वांगीण चाचण्या आणि समुपदेशनाची सोय सर्वत्र होणार आहे. नागपूर येथे तर पुढील सात दिवसांत हे क्‍लिनिक उभारण्याचा निर्णय झाल्याची माहिती ‘सोशालिस्टिक ऑपरेशन फॉर ॲकेडमिकली हॅण्डिकॅप ॲण्ड मेन्टोरशिप’ (सोहम) संस्थेचे अध्यक्ष आणि यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीचे सदस्य डॉ. संजय अवचट यांनी सांगितले. मुंबईच्या ग्रॅंड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. व्ही. पी. काळे हेही या समितीत सदस्य आहेत. 

कोण अक्षम? 
ज्या बालकांना कोणतेही शारीरिक-मानसिक व्यंग-अपंगत्व नाही; परंतु ज्यांचा बुद्‌ध्यंक हा सर्वसामान्य आहे. ज्यांना वाचन-लेखन तसेच गणिताविषयीच्या मूलभूत समस्या आहेत व टोकाचे प्रयत्न करूनही त्यामध्ये नगण्य सुधारणा होते, अशा बालकांना अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॲबिलिटी) असू शकते.

क्‍लिनिकचा उपयोग 
अध्ययन अक्षमता असणाऱ्या बालकांची सर्वांगीण चाचणी, पालकांचे समुपदेशन, शास्त्रीय चाचण्या करून त्यांच्यात अध्ययन अक्षमता आहे किंवा नाही, त्याची तीव्रता किती आणि अक्षमता नेमक्‍या कुठल्या प्रकारची, याचे निदान होईल. अध्ययन अक्षमतेचे प्रमाणपत्रही मिळेल.

आमचा १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरूच होता. परंतु, ‘सकाळ पेंडॉल’मधून या प्रश्‍नाला वाचा फोडल्यावर गती मिळाली. त्याबद्दल सकाळचे आभार. अक्षमता असलेल्या ५० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्या क्‍लिनिकचा लाभ होईल. अक्षम विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. 
- डॉ. संजय अवचट, सदस्य, लर्निंग डिसॲबिलिटी क्‍लिनिक समिती

Web Title: learning disability clinic sakla pendol state government