राज्यात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत निवडणूकीनंतर

अजित पवारांनी केली भूमिका स्पष्ट
अजित पवार
अजित पवार sakal

माळेगाव : राज्यात महानगर पालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका आगामी काळात होत आहेत. विशेषतः नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष होण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामध्ये बारामतीत नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी येथे मोठी राजकिय स्पर्धा आहे. अशा स्पर्धकांचा विचार करता आम्ही शासनस्तरावर नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती या निवडणूक झाल्यानंतर घेण्याचे ठरविले आहे. माळेगावचे धरसोडीचे राजकारण पाहता राष्ट्रावादी पक्ष घडाळ्याच्या चिंन्हावर निवडणूक लढविणार आहे, अशी निर्णायक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केली. पवारांच्या या विधानाने मात्र माळेगावची आगामी निवडणूक ही फाटी आखूण होणार असल्याचे संकेत कार्य़कर्त्यांना मिळाले.

अजित पवार
विकी-कतरिनाच्या लग्नावर भन्नाट मीम्स व्हायरल; पोट धरून हसाल!

माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे राजहंस संकूलच्या नुतनिकरण इमारतीच्या उद्धटान प्रसंगी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. माळेगाव नगरपंचायत शासनस्तरावर नव्याने अस्तित्वात आली आहे. ही प्रकिया पुर्णतः नियमानुसार पार पडली आहे. या नगरपंचायतीच्या निवडणूक कार्य़क्रमाला भाजप विचारांच्या काहींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर लवकरच मार्ग निघेल, अशी माहिती पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते दिपक तावरे यांचे नाव घेत स्पष्ट केली. पवार पुढे म्हणाले, बारामती तालुक्याच्या राजकारणामध्ये माळेगावला विशेष महत्व आहे. या गावात पवारसाहेब राहतात आणि माळेगाव साखर कारखाना हा पवारसाहेबांचा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो. असे असले तरी येथील राजकारण मात्र धरसोडीचे करताना अनेकजण मी पाहिले आहेत. या गावातील विरोधकांना निवडणूक आली की आंगात येते.

अजित पवार
बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभ

विधानसभा असो अथवा माळेगाव कारखाना, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक असो, प्रत्येक निवडणूकीत येथील विरोधक काहीतरी मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करतात. अर्थात लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. अशा शब्दात पवारांनी भाजपच्या नेतेमंडळींचा नाव न घेता समाचार घेतला.

यावेळी पवार यांनी तालुक्यात सर्वांगिण विकास होत असताना काही लोकांच्या टिकाटिपणीलाही मला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. बारामतीसह माळेगावच्या नागरिकांचे माझ्याकडून कधीही हेतुपुरस्कर नुकसान होणार नाही हा मी शब्द देतो, तसे झाल्यास तुम्ही खुशाल पवारसाहेबांना माझ्याबद्दल तक्रार करू शकता, असेही मोकळीक उपस्थितांना देताना पवार विसरले नाहीत.

दादांची रोखठोक भूमिका

माळेगावच्या सभेत कार्यकर्ते अविनाश भोसले यांनी थेट दादांना सवाल केला...यंदाच्या निवडणूकीत आम्हाला उमेदवारी मिळेल का ? लागलीच दादा म्हणाले....माळेगावबाबत आम्ही जिंकूण येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच राष्ट्रवादीचे तिकीट देणार आहे. त्यामुळे जो कार्यकर्ता त्या निकषामध्ये बसेल त्याला तिकीट हे मिळणारच आहे. दादांचे हे रोखठोक उत्तर मिळताच सभेत एकच खळबळ उडाली.

पवारांनी सांगिलेले नगरपंचायतीचे फायदे : शासनस्तरावर कोठ्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दरवर्षी उपलब्ध होणार, माळेगावमध्ये सुदैवाने सरकारी गायराण जागा मुबलक असल्याने खासगी क्षेत्रावर आरक्षण कमी पडणार, बारामती शहराच्या तुलनेत माळेगावात नियोजनबद्दल विकास करण्यास वाव असणे, प्रशस्त रस्ते, दिवाबत्ती, सांडपाण्याची सुविधा, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, ठिकठिकाणी मैदान होणार आहेत. हे नगरपंचायतीचे फायदे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी दिपक तावरे आदी कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे, अशा सूचना अजित पवारांनी यावेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com