Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार कालवश

Legendary Actor : देशभक्तिपर चित्रपटांतून ‘भारतकुमार’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेता मनोजकुमार यांचे ८७ व्या वर्षी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले.
Manoj Kumar
Manoj KumarSakal
Updated on

मुंबई : देशभक्तिपर चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवत ‘भारतकुमार’ अशी उपाधी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार (वय ८७) यांचे गुरुवारी पहाटे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. अभिनेते मनोजकुमार यांनी आपल्या चित्रपटातून विविध ज्वलंत समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ५) विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com