Sambhajiraje: महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा; नियम मोडला की राज्याबाहेर हाकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje

महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा; नियम मोडला की राज्याबाहेर हाकला, संभाजीराजेंची मागणी

मुंबईः भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान होत आहे. यावरुन संभाजीराजेंनी भाजपची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्यांनी अशा लोकांना महाराष्ट्रबाहेर हाकलून देण्याची मागणी केलीय.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, प्रसाद लाड एकीकडे महाराजांना दैवत मानतो आणि दुसरीकडे महाराजांचा अभ्यास ठेवत नाही. भाजपने अशा लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. तरीही नाही ऐकलं तर यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकललं पाहिजे.

हेही वाचा: Amol Mitkari: बास्स! पुढचा मार्ग भगतसिंगांचा; महाराजांबद्दलच्या नव्या वादावर राष्ट्रवादीची भूमिका

''राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याची पहिली मागणी मी केलेली आहे. जोपर्यंत त्यांना राज्याबाहेर हाकललं जात नाही तोपर्यंत स्वराज्य संघटना लढणार आहे. एवढे सगळे लोक महाराजांबद्दल बोलत असतांना भाजप ठाम भूमिका का घेत नाही. यातून भाजपचा दुटप्पीपणा दिसून येतोय.''

पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, महापुरुषांबद्दल बोलतांना तारतम्य पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरुन कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.