भाजपचं ठरलं; कॉंग्रेसची घोषणा कधी? राजकीय पक्षांनी कसली कंबर : Belguam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-BJP

भाजपतर्फे पहिली उमेदवारी यादी घोषित करण्यात आली असून, त्यात महांतेश कवठगीमठ यांचा समाविष्ट आहे.

भाजपचं ठरलं; कॉंग्रेसची घोषणा कधी? राजकीय पक्षांनी कसली कंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची (BJP) पहिली प्राथमिक यादी घोषित करण्यात आली आहे. पण, कॉंग्रेस (Congress) पातळीवर अद्याप सामसूम आहे. कॉंग्रेसतर्फे १४ नोव्हेबरनंतर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील पंचवीस जागांसाठी विधानपरिषद निवडणूक घोषित झाली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीची जोमाने तयारी सुरु केली असून, युध्दपातळीवर उमेदवारी चाचपणीला सुरवात करण्यात आली आहे.

भाजपतर्फे पहिली उमेदवारी यादी घोषित करण्यात आली असून, त्यात महांतेश कवठगीमठ यांचा समाविष्ट आहे. यामुळे भाजपने पहिली यादी घोषित केली आहे. कॉंग्रेसकडून उमेदवारी कधी घोषित केली जाणार आहे, त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या शिवाय कॉंग्रेसकडे आठ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्या आठ जणांपैकी एकाला उमेदवारी जाहीर केली जाणार वा अन्यला उमेदवारी मिळणार आहे, त्याकडेही लक्ष लागून आहे.

याबाबत उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार भाजपने मंगळूर मतदार संघातून कोटा श्रीनिवास पुजारी यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. गुलबर्गा-बी. जी. पाटील, धारवाड-प्रदीप शेट्टर, चिक्कमंगळूर-एम. के. प्राणेश, कोडगू- सुनील सुब्रमनी आणि बेळगाव-महांतेश कवठगीमठ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पण, अंतिम यादी अजून जाहीर व्हायची आहे. उमेदवारी घोषणेबाबत भाजप आघाडीवर दिसतोय. तर कॉंग्रेस पातळीवर चर्चा आणि बैठकीचे नियोजन सुरु आहे.

हेही वाचा: तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना नोटीस

उमेदवारीबाबत १४ रोजी चर्चा

कॉंग्रेसकडे एकूण आठ जणांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यात माजी आमदार वीरकुमार पाटील, श्‍याम घाटगे, चन्नराज हट्टीहोळी आदींसह अन्यचा समावेश आहे. उमेदवारी अर्जावर चर्चेसाठी येत्या १४ नोव्हेंबरला बैठक आयोजित केली असून, त्या बैठकीत निर्णय प्रस्ताव हायकमांडला याबाबतचा पाठविला जाईल.

loading image
go to top