विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (ता. 28) होणार आहे. 

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (ता. 28) होणार आहे. 

विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. विधान परिषदेच्या चार जागांपैकी मुंबई आणि कोकण पदवीधर मतदासंघांतील निवडणूक सर्वाधिक लक्षेवधी ठरली. मुंबईमध्ये शिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी जुने शिवसैनिक विलास पोतनीस यांना मैदानात उतरविले होते. भाजपने शिवसेनेच्या विरोधात अमितकुमार महेतांना उमेदवारी दिली होती. शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच डाव्या पक्षांचा पाठिंबा असलेले शेकापचे राजेंद्र कोरडे हे रिंगणात उतरले आहेत. याशिवाय मराठी भाषा केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनीही जोर लावला आहे. 

कोकण पदवीधरमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत झाली. नाशिक शिक्षक मतदासंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, टीडीएफचे भाऊसाहेब नारायण कचरे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंबा असलेले संदीप बेडसे यांच्यात प्रमुख लढत झाली. 

Web Title: Legislative Council election results today