मुंबई : विधान परिषदेची गणिते सुरु

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अनेक नावावर चर्चा
Eknath khadse
Eknath khadsesakal
Updated on

मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे विद्यमान सभापती रामराजे निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना संधी देण्यावर एकमत झाल्याचे समजते. आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अनेक नावावर चर्चा करण्यात आली. मात्र रामराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी देतानाच एकनाथ खडसे यांचाही सन्मान राखण्याची भूमिका सहमत झाल्याची माहिती आहे.

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराबद्दलचे हिशेब सुरु असतानाच विधान परिषदेची विजयी समीकरणे कशी असतील याचा अंदाज घेणे सुरु झाले आहे.भाजपची सदस्यसंख्या लक्षात घेता सर्वाधिक उमेदवार निवडून येतील हे उघड असून दिल्लीतून ही नावे निश्चित ठरतील. परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे ही नावे जवळपास निश्चित झाली असून चौथ्या नावासाठी चित्रा वाघ, सदाभाऊ खोत अशा नावांवर विचार सुरु आहे. दिल्लीचे धक्कातंत्र लक्षात घेता कोणतेही नवे नाव समोर येऊ शकेल. परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने येथे भाजपची सरशी होवू शकते, अशी अटकळ केली जाते आहे. १० जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याच (ता. ८) नावे निश्चित होऊन अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र आतापर्यंत त्यांच्याकडे पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली नव्हती. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांबाबत आज पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे आणि एस.एम.पाटील यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. सध्या विधानपरिषदेत काँग्रेसचा एकही सदस्य नाही. त्यामुळे दोन पैकी एक दलित उमेदवार द्यावा अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांची आहे. .

शिवसेनेकडून सचिन अहिर

शिवसेनेने या निवडणुकीत नव्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या सचिन अहिर यांना परिषदेवर पाठवले जाणार आहे. नंदूरबारमधील आमशा पाडवी यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना वगळले जाईल काय याबद्दल शंका आहे. काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता दोन आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नावे कोणती याचा निर्णय मात्र झालेला नाही. ९ जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने उद्या (ता. ८) नावे निश्चित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com