बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे मृत्युमुखी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नारायणगाव- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील पवारमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. मृत वासरांचा पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल एस. एन. सोनवणे यांनी दिली. 

वडगाव कांदळी परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. एक महिन्यापूर्वी येथील सूर्यकांत पाचपुते यांच्या वासरांचा बिबट्याने फडशा पाडला होता. शनिवारी (ता. 5) पहाटेच्या सुमारास पवारमळा येथील सुभाष पवार यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरांवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. यापैकी एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला. वनपाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

याबाबत सोनवणे म्हणाले, ""या भागात ऊसशेती असल्याने बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांनी गोठे बंदिस्त करून जनावरांचे बिबट्यापासून संरक्षण करावे. पुढील काही दिवसांत ऊसतोडणी सुरू होणार असल्याने बिबट्यांची निवासस्थाने बदलणार असल्याने ते सैरभैर होण्याची शक्‍यता आहे. यामुळे बिबट्याचे हल्ले वाढण्याची शक्‍यता आहे. शेतात घर करून राहणाऱ्या ग्रामस्थांनी स्वत:ची व जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे.'' 

Web Title: Leopard attack killed two calves

टॅग्स