गायींकडून गोठ्यात बिबट्याची ‘शिकार’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

संगमनेर - सुमारे ३० गायी असलेल्या मुक्त गोठ्यात भक्ष्याच्या शोधात घुसलेल्या बिबट्याला पाहून, सैरभैर झालेल्या गायींच्या पायाखाली तुडवला गेल्याने, सुमारे दीड वर्ष वयाच्या नरबिबट्यावर प्राण गमावण्याची वेळ आली.

उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) शिवारातील कारवाडी परिसरात सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या घराजवळ मुक्त गोठा आहे. यात २५ ते ३० गायी आहेत. गोठ्यात शुक्रवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने, गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याला पाहून घाबरलेल्या गायी संरक्षणासाठी उधळल्या. गायींच्या  पायाखाली तुडवला गेल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. गायींच्या हंबरण्यामुळे गोठ्याजवळ आलेले उंबरकर कुटुंबीयाने घटनेची माहिती वनविभागाला दिली.  वनक्षेत्रपाल बाळासाहेब गिते यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याचा मृतदेह रोपवाटिकेत हलविला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत तांबे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Leopard Hunt by Cow