esakal | ग्रंथालये उघडण्याच्या तयारीत, मात्र राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा..  

बोलून बातमी शोधा

library

गेले तीन महिने कोरोनामुळे राज्यातील ग्रंथालये बंद आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले मात्र अजून राज्य सरकारने ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी दिली नाही.

ग्रंथालये उघडण्याच्या तयारीत, मात्र राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा..  
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: गेले तीन महिने कोरोनामुळे राज्यातील ग्रंथालये बंद आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले मात्र अजून राज्य सरकारने ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी दिली नाही. मात्र ग्रंथालयांतील वाचकांकडून काही वेळासाठी ग्रंथालय उघडण्याची मागणी केली जाते. ग्रंथालय व्यवस्थापकांनी वाचकांसाठी योग्य त्या सुरक्षित उपायोजना करून ग्रंथालय खुली करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र ते राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षेत ग्रंथालये आहेत. 

 लॉकडाऊन ग्रंथालये बंद आहे. याचा फटका ग्रंथालयातील कर्माचाऱ्यांना बसत आहे.. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जुलै महिन्यापासून ग्रंथालय सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देईल अशी अपेक्षा होती मात्र 31 जुलै पर्यंत ग्रंथालय बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला. ग्रंथालय व्यवस्थापनाचा हिरमोड झाला . 

हेही वाचा: मुंबईत आज 'इतक्या' कोरोना रुग्णांची नोंद; जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नायगाव शाखेचे कार्यवाह कृष्णा नाईक म्हणाले, ग्रंथालय सुरु करण्याच्या आम्ही तयारीत होतो. त्यासाठी मध्यवर्ती व आमच्या शाखेचे स्थानिक नेत्यांच्या मदतीने ग्रंथालय सॅनिटायिज करून घेतले होते. परंतु पुन्हा 31 जुलै पर्यंत बंदचा आदेश आला. वाचकांकडून ग्रंथालय सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही ग्रंथालय सुरू करण्याबाबत नियमावली तयार करत आहोत. 

सॅनिटायरचा वापर, ग्लोज, मास्क, पुस्तक देवाण-घेवाण, लहान मुले व ज्येष्ठ नागिरकांना त्यांच्या ग्रंथालय व्यवहारासाठी अधिकारपत्र देणे तसेच पुस्तक परतीचा कालावधीत वाढ अशा मुद्द्यांचा समावेश असणार आहे. परंतु ग्रंथालयांसाठी ग्रंथालय संचालनालयाने मार्गदर्शक तत्त्वांची नियमवाली तयार करून ती राज्य सरकारला देणे अपेक्षित आहे, जेणे करून राज्य सरकार ग्रंथालय सुरू करण्यास परवानगी देईल,  असे नाईक यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, ग्रंथालयांसाठी अनुदान मिळाले नाही, वर्गणी नाही त्यामुळे आर्थिक समस्या नक्कीच जाणवत आहे. पण ग्रंथालय राजाश्रयापेक्षा ती लोकाश्रयावर चालतात. त्यामुळे दानशूर व्यक्ती मदतीचा हात देतील अशी अपेक्षा आहे. 

राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, वाचक ग्रंथालय सुरू करण्याची मागणी करत आहेत. सर्व राज्य सरकारत्या नियमांचे पालन करून ग्रंथालय सुरू करण्याची इच्छा आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, ग्रंथालय संचालनालय यांना पत्र दिले. मात्र राज्य सरकारची परवानगी नसल्याने ग्रंथालय सुरू करणे शक्य नाही, असे त्यांच्याकडून उत्तर आले. मुख्यमंत्र्यांनाीही ग्रंथालय सुरू करण्यासाठी पत्र दिले मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. राज्य सरकारने ग्रंथालय सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांची नियमावली तयार करून त्याप्रमाणे ग्रंथालय उघडण्यास परवागी द्यावी, अशी आमची मागणी आहे. 

राज्यातील ग्रंथालयांना मार्चमधील अनुदान मिळाले नाही. त्याबाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अनुदान नसल्याने राज्यातील ग्रंथालय कर्माचाऱ्यांची उपासमार होत आहे. या संदर्भात सर्व जिल्हातून राज्य  सरकारकडे पत्र व्यवहार सुरू आहे. पण राज्य सरकारने याची दखल घेतली नाही, असे कोटेवार यांनी सांगितले. 

हेही वाचा: मुंबईत रेल्वे रुळांवर वॉटर लॉगिंगचा प्रश्न यंदा मिटणार; पाण्याचा निचराही होणार जलद..मध्य-पश्चिम रेल्वेचा दावा.. 

काही ग्रंथालय ऑनलाईन पर्याय देतात. परंतु त्यांची संख्या फारच कमी आहे. मुळात राज्यातील ग्रंथालयात डिजिटल व्यासपीठ उभारण्यासाठी सद्य परिस्थितीत यंत्रणा आणि त्यासाठी लागणारा खर्च नाही. ग्रंथालयात येणारा वाचक ऑनलाईनपेक्षा  पुस्तक घरी नेऊन वाचण्यास प्राधान्य देतो, असेही ते म्हणाले. ग्रंथालयांचे रखडलेले अनुदान व कर्मचाऱ्यांचे वेतन याबाबत उच्च वतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असला संपर्क होऊ शकला नाही.

libraries in state waiting for governments orders to open