मुंबईत रेल्वे रुळांवर वॉटर लॉगिंगचा प्रश्न यंदा मिटणार; पाण्याचा निचराही होणार जलद..मध्य-पश्चिम रेल्वेचा दावा.. 

water loging
water loging
Updated on

मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेने ल़ॉकडाऊन दरम्यान नालेसफाई आणि इतर तांत्रिक काम पुर्ण केले. मोटर पंपची संख्याही वाढवण्यात आल्याने, यावेळी तीन दिवस पाऊस पडूनही रेल्वेमार्गावर फारसे पाणी साचले नाही असा दावा रेल्वेने केला आहे. 

लॉकडाऊन काळात नाले सफाई झाल्याने पाण्याचा तात्काळ निचरा होण्यास मदत होत आहे.शिवाय दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणी 1800 मिमी चे ड्रेऩेज पाईप टाकण्यात आसे आहे. दोन्ही रेल्वेने गेल्या वर्षींच्या तुलनेत पाणी उपसण्यासाठी  मोटार पंपची संख्या वाढवल्यावे  रेल्वे रुळांवर साचलेले पाणी वेगाने बाहेर काढण्यात मध्य, पश्चिम रेल्वेला यश आले आहे. 

याशिवाय पश्चिम रेल्वेने  वसई रेल्वे यार्ड, नालासोपारा-विरार, नालासोपारा-वसई आणि गोरेगाव-मालाड तर मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला आणि टिळक नगर या ठिकाणी ड्रेनेज पाईप बसवले आहेत. तर अंधेरी, वांद्रे, माहीम, बोरीवली, गोरेगाव आणि प्रभादेवी या ठिकाणी ड्रऩेज क्लिनीक करण्यात आले आहे. सुमारे 30 किलोमीटर पर्यंतची ड्रनेज लाईन साफ करण्यात आली आहे. 

पाणी उपसण्यासाठी मोटर पंपची संख्या वाढवली:
 
तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 58 मोटार पंप सुद्धा वाढविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 144 मोटार पंपाच्या सहाय्याने रुळांवरील पाण्याचा निचरा केला जात होता. मात्र, यावर्षी सुमारे 202 मोटार पंप पश्चिम रेल्वे मार्गांवर सज्ज असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे. मध्य रेल्वे मार्गावर गेल्या वर्षी 93 मोटार पंप होते. यावर्षी 55 मोटार पंप वाढविण्यात आले असून, यावर्षी 148 मोटार पंप रुळांवर भरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे.

now there is no water logging on railway track said railway

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com