दुध, अन्नपदार्थ आणि औषधांच्या भेसळीसाठी आता आजन्म कारावास

Girish Bapat
Girish Bapat

मुंबई : दुध किंवा इतर खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अगोदर अवघी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असलेला अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आता दखलपात्र करण्यात आला असून कठोर शिक्षेची तरतूद करणारे सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी बहुमताने मंजुर करण्यात आले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
1860 च्या भारतीय दंड संहितेच्या अधिनियम 45 मधील कलम 272 ते 276 अन्वये खाद्यपदार्थ, पेय, औषधे आणि औषधासाठी लागणारे पदार्थ यामध्ये भेसळीसाठी सहा महिने कारावास आणि रुपये एक हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद होती. याशिवाय अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 36 अन्वये याच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद आहे. तर औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 च्या नियम 23आणि नियम 27मध्ये मात्र याच गुन्ह्यासाठी दहा वर्षे ते आजन्म कारावासासारख्या कडक शिक्षेची तरतूद आहे. ही बाब लक्षात घेता अन्न आणि औषधे भेसळीसंबंधीच्या अपराधांसाठी वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळ्या स्वरूपाची शिक्षा असल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे या सर्व प्रकारच्या कायद्यात अन्न आणि औषधांच्या भेसळीच्या गुन्ह्यासाठी एकाच स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता या गुन्ह्यासाठी अजीवन कारावास आणि द्रव्य दंडाची तरतूद असलेली सुधारणा करण्यात आली आहे. परंतु न्यायालयास काही अपवादात्मक परिस्थितीत पुरेशी कारणे नमूद करून आजीवन कारावासाची शिक्षा कमी करून त्यापेक्षाही कमी कालावधीची शिक्षा देण्याचीही तरतूद यात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com