मुंबईतील नदीकाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई आणि परिसरातल्या नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी दहिसर, पोयसर व मिठी नदीकाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महापालिकेने आपली भूमिका तीन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्‌भवणारी पूरजन्य परिस्थिती, दहशतवादी हल्ले अशा आपत्कालीन स्थितीत मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरांत नागरिकांना सतर्क करणारी यंत्रणा नाही. मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे, असे सांगत आपत्कालीन स्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारण्याबाबत राज्य सरकार आणि पालिकेने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्याचा एक भाग म्हणून मुंबईत दुसरे डॉप्लर रडार बसवण्यासाठी जागा देण्याच्या मागणीकरिता ऍड. अटल दुबे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी मुंबई आणि परिसरात नद्यांमध्ये विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी आणि केरकचरा सोडल्यामुळेही पूरपरिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास आणले. डॉप्लर रडार बसवण्यासाठी दिलेल्या जागेचे दर परवडण्यासारखे नसल्याने याबाबत चर्चा सुरू असल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. 

Web Title: Lift up the river sewage processing centers in Mumbai