सुधीरभाऊंची विखेंना खुली ऑफर!

टीम ई सकाळ
शनिवार, 18 मार्च 2017

अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) गोंधळ घालणाऱया विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. भाषणाच्या ओघात सुधीरभाऊंनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफरच दिली.

शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी मनगुंटीवार सभागृहात दाखल झाल्यापासून गोंधळ सुरू केला होता. विरोधक टाळ वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.

पर्यावरणावरील तरतुदींची माहिती देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या गोंधळाचा उल्लेख केला आणि ते म्हणाले, 'हे काय पर्यावरण आहे, ते बदलायला हवे. चांगले पर्यावरण हवे. त्यासाठी आम्ही तरतुदी करत आहोत.'

नद्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पांची माहिती देताना मुनगंटीवार यांनी नमामी चंद्रभागा योजनेचा तपशील सांगितला. त्यावेळी विरोधकांचा विठ्ठल विठ्ठल असा गजर सुरू होता. त्याचा संदर्भ घेऊन अर्थमंत्री म्हणाले, 'विरोधकांनी विठ्ठलाच्या नामाचा गैरवापर सुरू केला आहे. विखे साहेब, विठ्ठ्ल तिकडे नाही (विरोधी बाकांवर) इकडे आहे. तुम्हीपण इकडे या...!'

Web Title: Lighter movements of Mahrashtra's Budget 2017-18