कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना शिंदे गट युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकांचा मुलगा वैभव पाटील याच्यासह सात जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.