प्रत्यारोपणासाठी यकृत पहिल्यांदाच आणले लोकलमधून

प्रत्यारोपणासाठी यकृत पहिल्यांदाच आणले लोकलमधून

मुंबई : परळच्या ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णासाठी रुग्णालय प्रशासनाने ठाणे ते दादर लोकलमधून दात्याकडून मिळालेले यकृत आणले. दुपारच्या मार्गातील वाहतूक कोंडीचा अडथळा टाळण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती ग्लोबल रुग्णालय व्यवस्थापन दिली आहे. पहिल्यांदाच देशात अवयव प्रत्यारोपणासाठी लोकलचा मार्ग अवलंब केल्याचा दावा रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने केला. या प्रकाराने अवयवदानक्षेत्रात संमिश्र प्रक्रिया उमटत आहेत.

अपघातात मेंदू मृत झालेल्या 53 वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःहून अवयवदानासाठी पुढाकार घेतला. या रुग्णाकडून मृत्यूपश्‍चात यकृत आणि दोन मूत्रपिंडे उपलब्ध झाली. त्यापैकी यकृत हे ग्लोबल रुग्णालयाला उपलब्ध झाले. यकृत घेण्यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास ग्लोबल रुग्णालयाचे डॉक्‍टर्स पोहोचले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2.50 च्या सुमारास यकृत घेऊन ग्लोबलचे डॉक्‍टर्स निघाले.

ज्युपिटर रुग्णालय ते ठाणे स्थानक वाहतूक काही मिनिटे थांबवत यकृत ठाणे स्थानकापर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचले. 3.04 मिनिटांची फास्ट लोकल पकडून यकृतासह 3.33 मिनिटांनी यकृत पोहोचले. 3.40 मिनिटांनी पुन्हा वाहतूक पोलिसांच्या मदतीने पाच मिनिटांत ग्लोबल रुग्णालय रुग्णालयात पोहोचले. सायंकाळपर्यंत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून दिली गेली. 
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमाराल वाहतूकीतून रुग्णवाहिका सोडण्यासाठी ग्लोबल रुग्णालयाने कळवले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता दादर स्थानकातून रुग्णवाहिकेसाठी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आम्ही व्यवस्था करुन दिली. या संपूर्ण प्रवासात ग्लोबल रुग्णालयातील सहा डॉक्‍टर्स आणि आरपीएफची मदत घेत लोकलमधून प्रवास करत होते. 

लोकलमधून यकृत आणणे आश्‍चर्यकारक आहे. संपूर्ण सुरक्षेसह लोकलमधून प्रतीक्षा यादीतील रुग्णाला यकृत मिळाले असेल तर याबाबतचे कौतुक करायला हवे.

- पुरुषोत्तम पवार, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ बॉडी एण्ड ऑर्गन डोनेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com