शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या राज्यातील सुमारे १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. या शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी लाभ मिळेल, यादृष्टीने सहकार विभागाचे नियोजन सुरू आहे.
mantralay

mantralay

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या राज्यातील सुमारे १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. या शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी लाभ मिळेल, यादृष्टीने सहकार विभागाचे नियोजन सुरू आहे. तीन टप्प्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे (डीसीसी बँक) १२ ते १४ हजार कोटी रुपये या कर्जमाफीतून वसूल होणार आहेत. तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे देखील शेतकऱ्यांकडे २० हजार कोटींहून अधिक रुपये थकले आहेत. या बॅंकांचीही थकबाकी आता वसूल होणार आहे. पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यातून निधी मंजूर झाला आहे. त्याची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यांची स्वाक्षरी झाल्यावर वित्त विभागाकडून कर्जमाफीचा निधी सहकार विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आली आहे.

निकषांनुसार अपात्र शेतकऱ्यांना वगळून पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हा, तालुका व गावनिहाय याद्या अंतिम करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील आठवड्यात याद्या अंतिम झाल्यावर पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे. निकषांत बदल केल्याने ५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ४० हजार कोटी रुपये लागतील, असे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

३१ जुलैपूर्वी कर्जमाफीचा लाभ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांसाठीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. योजनेतून थकबाकीतील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये, तर नियमित कर्जदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मिळाली असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम केल्या जात आहेत. दुसरीकडे पुरवणी मागण्यांमधून कर्जमाफीसाठी मंजूर निधीच्या फाईलवर दोन दिवसांत राज्यपालांची स्वाक्षरी होईल. त्यानंतर ३१ जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित होईल.

- दत्तात्रेय भरणे, कृषिमंत्री

कर्जमाफीची स्थिती

  • एकूण थकबाकीदार

  • ५६ लाख

  • एकूण थकबाकी

  • ३६,००० कोटी

  • दोन लाखांपेक्षा कमी थकबाकीदार

  • १५.२७ लाख

  • दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार

  • १७ लाख

  • अंदाजे नियमित कर्जदार

  • २४ लाख

कर्जमाफीचे तीन टप्पे असे...

  • १) पहिल्यांदा दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी (पीककर्जाची) असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यांचे सातबारे कोरे होऊन त्यांना नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

  • २) ज्या शेतकऱ्याने दोन लाख रुपयांहून अधिक पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्जदेखील घेतले आणि दोन्ही कर्जे सध्या थकबाकीत आहेत, त्यांना दोन लाखांवरील संपूर्ण रक्कम बँकेत भरावी लागेल. त्यानंतरच त्यांना दोन लाखांची माफी मिळेल.

  • ३) २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांतील दोन वर्षांत कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यात या शेतकऱ्यांच्या बचत खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

2,418 farmers from Mangalwedha included in the second farm loan waiver list.
Maharashtra Loan Waiver
mantralay
mantralay
Marathi News Esakal
www.esakal.com