कर्जमाफीचे वाढले अडीच लाख लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

सोलापूर - कुटुंबाऐवजी वैयक्‍तिक कर्जदार या निकषानुसार राज्यात दोन लाख ५७ हजार ३२८ कर्जदार वाढल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यातील दुष्काळ यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकरकमी परतफेड योजनेकडे (ओटीएस) पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंकांसमोरील अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसने काही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. तसेच सत्ता आल्यास अन्य राज्यांमध्येही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, असेही स्पष्ट केले. दुसरीकडे राज्यातील दुष्काळ, वेळेवर न मिळणारी एफआरपी, हमीभावाची प्रतीक्षा आणि कांद्याच्या दराचे वांदे, दुधाचे घसरलेले दर व अनुदानाची प्रतीक्षा यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे.

कुटुंबाऐवजी आता वैयक्‍तिक कर्जदाराला दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढणार असून, आतापर्यंत राज्यातील ४१ लाख लाभार्थ्यांना १७ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत. 
- संतोष पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, सहकार विभाग

Web Title: Loanwaiver 2.5 lakh Beneficiary Increase