‘ओटीएस’वर शेतकरी नाखूष

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर्जमाफी योजनेत एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) करण्यास अनेक शेतकरी नाखूश आहेत. विशेष म्हणजे काही बॅंकांमध्ये ओटीएसच्या रकमा भरूनही शेतकऱ्यांना माफीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

पुणे - राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर्जमाफी योजनेत एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) करण्यास अनेक शेतकरी नाखूश आहेत. विशेष म्हणजे काही बॅंकांमध्ये ओटीएसच्या रकमा भरूनही शेतकऱ्यांना माफीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाखाली भाजप सरकारने दीड लाखापर्यंत दिलेल्या कर्जमाफीबाबत शेतकरी फारसे समाधानी नाहीत, असे सहकारी बॅंकांचे म्हणणे आहे. या योजनेनुसार मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस सुविधा आणली गेली. दीड लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्याने भरल्यास दीड लाख कर्जमाफीची सरकारकडून मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याचे खाते ''निल'' होईल, असा हेतू सरकारचा होता. 

"शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी हवी होती. त्यामुळे दीड लाखाच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्यांना मिळालेले २५ हजारांचे प्रोत्साहनदेखील तुटपुंजे आहे. नियमित कर्ज भरून चूक केल्याचे शेतकरी सांगतात. नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान एक लाखाचे प्रोत्साहन हवे होते. सर्वांत वाईट बाब म्हणजे ओटीएसखाली दीड लाखाच्या वरील रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमाही थकीत आहेत.

कर्जमाफीची वस्तुस्थिती 
    योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत वाढविण्याची गरज 
    ओटीएससाठी पैसे भरूनही सरकारकडून माफीच्या रकमा मिळाल्याच नाहीत
    शेतकऱ्यांना आता सर्व कर्ज माफ होईल असे वाटते
    कर्जमाफीच्या अपेक्षेने राज्यभरात २०१६-१७ ची हजारो कोटींची कर्जफेड शेतकऱ्यांनी केलेली नाही
    दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कर्जफेडीची क्षमता घटली 
    कर्जमाफीच्या रकमा सरकारकडून हळूहळू दिल्या जातात. आधी मिळाले ६०० कोटी रुपये, त्यानंतर दिले एक हजार कोटी.

नववर्षात मिळणार खरिपाचा पीकविमा
सोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही  मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील ९४ लाख ६४ हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्‍कम मिळणार आहे.पहिल्या टप्प्यात वादळ, अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई दिली जाणार आहे.

Web Title: Loanwaiver Issue Farmer Unhappy