लॉकडाउमुळे राज्यात दूध व्यवसाय आला अडचणीत

Milk
Milk

पुणे - मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध व्यवसाय लॉकडाउमुळे कोलमडण्याची वेळ आली आहे. लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्विटमार्ट बंद असल्याने मागणी घटल्याचे कारण देऊन खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाई आणि म्हशीच्या दरात १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादकांना पदरमोड करून खर्च भागवावा लागत आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउमुळे हा व्यवसाय डबघाईला आला. लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्विटमार्ट बंद असल्याने दुधाला मागणी घटल्याचे कारण पुढे करून सहकारी तसेच खासगी दूध संघांनी दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. अाधीच संकटात असलेल्या दूध उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. 

मजुरीही निघत नाही
२० म्हशी व २५ गायींच्या गोठ्यासाठी मजुरी आणि इतर सर्व खर्चासह महिन्याकाठी एक लाखांपर्यंत खर्च येतो. तर त्यात एकूण उत्पादन एक लाख १० हजारांपर्यंत आहे. म्हणजेच लाखभर रुपयाच्या खर्चातून १० हजार रुपये एवढा तुटपुंजा नफा मिळत आहे. तर, एका गाईचा एका दिवसासाठी दोन्ही वेळेचा ओला, सुका चारा आणि पशुखाद्याचा खर्च किमान १०० ते १५० रुपये इतका होतो. त्यात गाईचे दिवसाचे सरासरी दहा लिटर दूध गृहीत धरले, तर १८ रुपये प्रतिलीटरचा दर विचारात घेता १८० रुपये मिळतात.

दूध व्यवसायातील अडचणी

  • राज्यात गाईच्या दुधाला १५ ते २७ रुपये दर
  • म्हशीच्या दुधाला १८ ते ३७ रुपये दर
  • दुधाच्या पेमेंटलाही अनेक ठिकाणी उशीर
  • विदर्भ, मराठवाड्यात खासगी दूध संघांचे खरेदीत वर्चस्व
  • पश्‍चिम महाराष्ट्रात दूध दरात अधिक घट
  • पशुखाद्याच्या दरातील वाढीमुळे तोटा वाढला
  • अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय बंद केला
  • शासकीय दूध खरेदीत ठिकठिकाणी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा

माझ्याकडे ७० गाई आहेत. त्यातील २५ दुधाच्या आहेत. रोज २०० लिटर दूध संकलन होते. एवढ्या जनावरांचे संगोपन करणे खरोखरच जिकिरीचे झाले आहे. दुधाला मागणीच नसल्याने दर मिळत नसल्याचे सांगितले जाते. पूर्वीचा धंदा आहे. लगेच मोडणे शक्य नाही, म्हणून करतो आहोत. करणार काय? 
- पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर

पशुखाद्याचे दर (५० किलो/रुपये)
२६०० - सरकी पेंड
१२५० - कांडी पेंड 
१४०० - सुग्रास पोते
२४०० - खापरी पेंड
९०० - मका भरडा
३ ते ४ - ओला चारा 
(प्रतिकिलो)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com