esakal | राज्यात पुन्हा लॉकडाऊन? पण सर्वसामान्यांना परवडणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown not possible

रुग्णसंख्या वाढते. म्हणून ताबडतोब लाॅकडाऊन करणे हे परवडणारे नाही. शासनाने हवे तर निर्बंध कडक करावेत.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? पण सर्वसामान्यांना परवडणार नाही

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची वार्षिक नियोजन आराखड्याची बैठक उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता.१५) औरंगाबादेत पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत श्री.पवार यांनी लोक मास्क वापरत नाहीत. कोरोनाचे आकडे दररोज वाढत चालले आहेत. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील असे सूतोवाच केले आहे. यामुळे राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का? यावर चर्चा रंगायला लागल्या आहेत.

वाचा : चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

अनेक जण भीती व्यक्त करित आहेत. राज्याचे नेते म्हणून त्यांना चिंता व्यक्त करणे साहजिकच आहे. आता राज्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पूर्वी कोरोनावर लस नव्हती. आता त्यावर मात करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे.राज्यातील दररोजची कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहिल्यास सरासरी तीन हजारांच्या वर असते. तसेच मृतांचा आकडाही पन्नासच्या खाली आहे. रुग्णसंख्या वाढते. म्हणून ताबडतोब लाॅकडाऊन करणे हे परवडणारे नाही. शासनाने हवे तर निर्बंध कडक करावेत.

वाचा : कोरोना अनुषंगाने कठोर निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुतोवाच, नियम पाळावे अन्यथा

त्याउलट नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायला हवी. राज्याची अर्थघडी व्यवस्थित सुरु झालेली असताना पुन्हा लाॅकडाऊन कसे शक्य. औरंगाबादच्या रिक्षा चालकापासून ते सर्वसामान्य औरंगाबादकरांना लाॅकडाऊन नको आहे. त्याऐवजी सरकारने या काळात बेरोजगार झालेल्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे ते सांगतात.

वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणः अरुण राठोडच्या आईला अश्रू अनावर, ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुणाचा नाही

कंपन्या, संस्था, शाळा, महाविद्यालयांना संबंधितांना पगार देणे जमलेले नाही. अनेकांना नाईलाजास्तव दुसरा व्यवसाय सुरु करावा लागला आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला असताना पुन्हा लाॅकडाऊन न परवडणारे आहे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, राजकीय सभा, धार्मिक महोत्सव येथे गर्दीवर नियंत्रण आणावे. तसेच नागरिकांनीही पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावे. शेवटी राज्य सरकारलाही जनतेचा विचार करावा लागणार आहे.

loading image