esakal | चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

चोरट्यांची दुचाकी चोरी फसली. पण...

चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : वरूडी (ता.पैठण) परिसरात शेतकरी शेतात पाणी भरत असताना चोरट्यांनी वरूडी येथील उपसरपंच तथा शेतकरी सोमनाथ दिलवाले यांची दुचाकी चोरून नेऊन एका शेतात तिची नासधूस करुन नुकसान केले आहे. ही घटना रविवार (ता.१४) रात्री घडली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरूडी येथील उपसरपंच सोमनाथ दिलवाले हे आपल्या शेतातील गट क्रमांक ७६ मध्ये ऊसाला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (एमएच २० ईझेड ५१९) ही रस्त्याच्या कडेला उभी करून शेतात पाणी भरत असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत त्यांची दुचाकी अर्धा किलोमीटर लोटत नेऊन तिला चालू करण्याचा प्रयत्न केला.

ती चालू न झाल्याने चोरट्यांनी तिचे स्पेअर पार्ट खोलून नेले. याबाबत एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात शेतकरी तथा उपसरपंच सोमनाथ दिलवाले यांनी तक्रार दिली. परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी घाबरले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर