जिल्हयात व्यवहार सुरू करण्याची योजना;शाळा सध्या डिजीटल नंतर फिजीकल

जिल्हयात व्यवहार सुरू करण्याची योजना;शाळा सध्या डिजीटल नंतर फिजीकल

मुंबई - चैाथ्या लॅाकडाउननंतर पुढे काय याबददल केंद्र सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा असली तरी महाराष्ट्र सरकारने कृषी,उदयोग,दुकाने आणि कायार्लये अशी विभागणी करीत कोणते क्षेत्र कसे सुरू करायचे याची आखणी केली आहे. दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली तर १०टक्के नागरिकांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, असे गृहित धरत या संख्येत रूग्ण हाताळण्याची तयारी असेल तेथे व्यवहार सुरू करण्यास मान्यता देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन शुक्रवारी किंवा शनिवारी मुंबईत येणार आहेत. 

रेड झोनमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही मात्र दुकाने उघडी केली जाणार आहेत.ज्याला गरज असेल तोच नागरिक बाहेर जाईल हे त्यामागचे गृहितक आहे.उदयोगांसाठी वापरली जाणारी ६० टक्के वीज सध्या उपयोगात आणली जात असल्याने १६ महापालिका क्षेत्रे वगळता अन्य भागातील कारखाने सुरू झाले आहेत.मुंबई पुण्यातील कामगार बह्रुतांश वेळा झेापडीतून येत असून तेथे रोगाचा फैलाव प्रचंड असल्याने हे उदयोग सुरू करताना उपलब्ध खाटांचा हिशेाब केला जाणार आहे.१० टक्के संभाव्य रूग्णांना वेळ न येवो पण गरज पडली तर किती व्हेंटीलेटर्स लागतील याचेही कोष्टक तयार केले जाते आहे.नोकरशाहीने मुंबई वगळता अन्य भागात आपण पिरिस्थती हाताळू शकतो आहेात असे सांगितले आहे.कृषी उत्पादन या पूर्वीच सुरू झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दिवसभर लॉकडाउनमधून बाहेर पडण्याच्या हालचाली कशा सुरू करता येतील याबददल अंदाज घेणे सुरू होते.जीवनावश्यक वैदयकीय प्रणाली काही जिलहयात आहे तर काही ठिकाणी नाही. नागपुरात २०० व्हेंटिलेटर्स आहेत पण एकाही रूग्णाला गरज नाही त्यामुळे तेथील सुविधा अन्यत्र वापरता येतील काय याचाही विचार सुरू आहे.राज्यात प्राणवायुचा पुरवठा करणाऱ्या २४,००० खाटा तयार आहेत. 

जिल्हाअंतगत वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.मात्र एका जिल्हयातून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परवानगी मात्र दिली जाणार नाही. 

शाळा सध्या डिजीटल 
शैक्षणिक वष्र् सुरू होत असल्याने त्याबाबत काय करायचे यावर विचार सुरू आहे.सर्व पालकांकडे संगणक किंवा स्मार्ट फोन नसेल पण सॅटेलाईटवरुन टीव्ही चॅनेल सुरू करता येईल का याची चाचपणी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड करीत आहेत.जिल्हापरिषद परिसरात कोरोना नसल्याने तेथे शाळा सुरू केल्या जातील तर नागरी भागात आधी फिजीकल नंतर डीजीटल अशी आखणी केली जाईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com