‘लॉकहीड मार्टीन’ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

Lockheed-Martin
Lockheed-Martin

औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत. 

लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही असेंब्ली लाइन महाराष्ट्रात करण्यासाठी ‘लॉकहीड’ने सकारात्मकता दाखवली आहे. हा आकडा किती आहे, याबाबत गोपनीयता असली, तरी ती १० हजार कोटी असावी, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे कारभारी दोन दिवस ‘एरो इंडिया २०१९’च्या निमित्त बंगळुरात होते. ‘लॉकहीड मार्टीन’च्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने नुकतीच तयार केलेली डिफेन्स पॉलिसी त्यांच्यासमोर मांडली. कमी दराने जागा देणे, मुद्रांक शुल्कात सूट, वीजदरात सवलत आणि अन्य औद्योगिक वातावरण या तीन बाबींवर लॉकहीड मार्टीन महाराष्ट्रात येण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. राज्याच्या संरक्षण धोरणात नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये स्थान देण्यात आले आहे. यातील औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या शहरांदरम्यान ही गुंतवणूक खेचण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. याशिवाय अन्य आरएडीएस, इस्राईल एरोस्पेस, एअरबस हेलिकॉप्टर्स, साब, अदानी ग्रुप आदी कंपन्यांशी चर्चा करण्यात आली.

कोणाची काय जमेची बाजू 
नाशिक - हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड सारखा भागीदार उपस्थित. विमानतळ आणि दुरुस्ती केंद्र, सुटे भाग तयार करणारे उद्योग उपलब्ध. 

औरंगाबाद - कोणत्याही विमानाला उड्डाण आणि लॅंडिंग करता येणारी धावपट्टी उपलब्ध. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बिडकीनमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध. स्वतंत्र धावपट्टी तयार होण्यासाठी मुबलक जागा. औद्योगिक वसाहतींची उत्तम क्षमता. 

नागपूर - ‘मिहान’मध्ये जमीन मुबलक प्रमाणात उपलब्ध. बोइंगसारख्या कंपन्यांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या कार्यान्वित. लॉकहीडचे यापूर्वी नागपूरमध्ये काम. कुशल मनुष्यबळ सहजतेने उपलब्ध. टाटा एरोनॉटिक्‍सचा विमानाचे पंख बनविण्याचे कारखाने कार्यान्वित.

लॉकहीड मार्टीन या लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात येण्याची तयारी दाखवली आहे. डिफेन्स पॉलिसी आम्ही त्यांना समजावून सांगितली असून नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे या उद्योग उभारणीसाठी पुढे करण्यात आली आहेत. 
- पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com