लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला प्रारंभ; आज क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे तर शिक्षकांसह 20,000 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 6 ते 9 एप्रिलला ट्रेनिंग

लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. बुधवारी ३७८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन भवनमध्ये प्रशिक्षण पार पडणार आहे. निवडणूक काळात नेमकी जबाबदारी काय व कामकाजाची पद्धत कशी असणार, यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
voting
votingsakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. आज (बुधवारी) ३७८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन भवनमध्ये प्रशिक्षण पार पडणार आहे. एका क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आठ ते दहा मतदान केंद्रांची जबाबदारी असते. निवडणूक काळात नेमकी जबाबदारी काय व कामकाजाची पद्धत कशी असणार, यावर त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत तीन हजार ६१७ मतदान केंद्रे आहेत. त्यातील एक हजार २४३ केंद्रे शहरी भागात तर दोन हजार ३५६ केंद्रे ग्रामीण भागात आहेत. या केंद्रांची प्रमुख जबाबदारी असलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर ६ ते ९ एप्रिल या चार दिवसांत शिक्षकांसह एकूण २० हजार कर्मचाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पार पडेल. त्यांना एकूण तीनवेळा प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचा दुसरा टप्पा एप्रिलमध्येच पार पडेल. मतदान केंद्रांवरील कार्यपद्धती, मतदान कसे करून घ्यावे, ईव्हीएमची खबरदारी, मतदार यादी व हाताला शाई लावणे, अशा विविध बाबींवर त्यांना यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील, यादृष्टीने मुख्याध्यापकांना नियोजन करावे लागणार आहे.

तक्रारीवेळी मोबाईल लोकेशन ऑन करा; बार्शीतून सर्वाधिक ३० तक्रारी, पण...

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रार करण्यासाठी नागरिकांना निवडणूक आयोगाने c-vigil हे ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय १९५० हा टोल फ्री क्रमांक देखील आहे. पण, नागरिकांनी तक्रार करताना त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ऑन करावे, जेणेकरून जिल्हा प्रशासनाच्या पथकाला त्याचा अचूक शोध घेण्यास मदत होईल. दरम्यान, जिल्ह्यातून आतापर्यंत ४९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ३० तक्रारींमध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही. १८ तक्रारी निकाली काढल्या असून एका तक्रारीवरील निकाल प्रलंबित आहे. विशेष बाब म्हणजे एकट्या बार्शीतून ३० तक्रारी प्राप्त झाल्या असून माळशिरस, करमाळा, माढा, मोहोळ, शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून एकही तक्रार आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com