‘लोकमंगल’वरून विरोधकांची घोषणाबाजी

Vidhimandal-Session
Vidhimandal-Session

मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर आज विधान परिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे लोकायुक्तांनी मान्य केल्याने प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली. तर, लोकमंगलने व्याजासकट निधी परत केला आहे. उलट कंपनीचा प्रामाणिकपणा लक्षात घ्यायला हवा, अशा शब्दांत सरकारची पाठराखण केली.

लोकमंगलने बनावट बिले सादर करून शासकीय अनुदानाचा मुद्दा काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास सुरू असून, कोणालाही पाठीशी घातले जात नसल्याचा दावा दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com