Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळकांवर का लागला होता देशद्रोहाचा आरोप? 6 वर्ष होते जेलमध्ये

लोकमान्य टिळकांचे योगदान आणि संघर्ष लक्षात घेऊन महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं होतं.
Lokmanya Tilak Jayanti
Lokmanya Tilak Jayantiesakal

Lokmanya Bal Gangadhar Tilak Birth Anniversary 2023 :

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक आहे. पण त्यांना सगळे बाळ गंगाधर टिळक याच नावाने ओळखतात. टिळक हे एक प्रखर देशभक्त, विद्वान, शिक्षक आणि महान स्वातंत्र्य सैनिक सगळेच जाणतात. त्यांच्या देशभक्ती पुढे इंग्रजही घाबरत होते.

टिळकांवर लागलेले आरोप, त्यांची अटक याची कहाणी कोणत्याही भारतीयाला चीड आणणारी आहे.

अटक करण्याचे कारण काय?

ही गोष्ट ३० एप्रिल १९०८ ची आहे. त्यावेळी इंग्रज सरकारचे जुलूम शिगेला पोहचलेले होते अन् स्वातंत्र्याची चळवळही जोरात सुरू होती. खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंदने न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्यातून ते बचावले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी खुदीराम बोस आणि प्रभुचंद यांना अटक केली.

टिळकांना जेव्हा या घटनेविषयी समजले तेव्हा त्यांनी त्यांचे वृत्तपत्र केसरीमध्ये बॉम्बस्फोटाच्या समर्थनार्थ आणि इंग्रज सरकारच्या कारवाईचे निंदा करणारे लेखन केले. यात खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद यांच्या समर्थनार्थ लेखन केले म्हणून इंग्रज सरकारने नागवार गुजरा आणि टिळकांना अटक करण्यात आली.

Lokmanya Tilak Jayanti
Lokmanya : लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास मालिकारुपात भेटीला

टिळकांना अटक केल्यावर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला. यानंतर त्यांना ६ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला.

इथेच लिहिलं गेलं गीता रहस्य

देशहितासाठी लिहिणे आणि क्रांतीकारकांच्या समर्थनार्थ आवाज उठवल्याबद्दल टिळकांना स्वतःचा अभिमान होता. त्यांनी विरोध न करता तुरुंगवास स्वीकारला. पण तुरुंगवासाच्या ६ वर्षांचा त्यांनी सकारात्मक आणि सर्जनशील पद्धतीने वापर केला. इथे त्यांनी ४०० पानांचे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.

Lokmanya Tilak Jayanti
Lokmanya Tilak Award: PM मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानं वाद! काँग्रेसकडून आक्षेप

समाज सेवेत पुढे

टिळक स्वराज्य आंदोलनात हिरीरीने भाग घेतला होता. १९१६मध्ये जेव्हा एनीबेसेंटने होम रुल लीगची स्थापना केली होती, त्यात टिळकांनी सक्रीयपण सहभाग घेतला आणि जनजागृती मोहिम राबवली. याच काळात त्यांना लोकमान्य हा किताब मिळाला.

महाराष्ट्रात १८९६ मध्ये प्लेगची साथ आली होती. यावर नियंत्रण आणण्यासाठी इंग्रज सरकार काही प्रयत्न करत नव्हते. यामुळे वैतागून टिळकांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि लोकांना मदत केली. पण त्यांच्या या सामाजिक कार्याचीही इंग्रजांना अडचण होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com