माढ्यातून लढण्यावर पवारांचे शिक्कामोर्तब 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पिंपळनेर (ता. माढा) येथील स्नेहल मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. 

ते म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदीमुळे दहशतवाद, भ्रष्टाचार संपेल असे म्हटले होते; पण नोटाबंदीनंतर दहशतवाद व भ्रष्टाचार वाढला आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. जीएसटीमुळे जे व्यापारी "मोदी मोदी' म्हणत होते, ते आज शिव्या घालत आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. बेरोजगारी संपविण्याचे आश्वासन दिले; पण निती आयोगाने साडेचार वर्षांत बेरोजगारी वाढल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या धोरणामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, रिझर्व्ह बॅंक, न्यायालयही सुटले नाही. "न खाऊँगा, न खाने दूँगा' म्हणणाऱ्यांनी राफेलमध्ये 560 कोटींचे विमान सोळाशे कोटींना खरेदी केले. हे झाले कसे, याची चौकशी करायला सरकार तयार नाही. 

सहकार्याची भूमिका कायम स्मरणात - पवार 
सोलापूर जिल्ह्यातील येथील सर्व मंडळींनी जिल्हा व राज्याच्या विकासासाठी एकजुटीने आम्हाला सहकार्य करण्याची जी भूमिका घेतली आहे, ती कायम आमच्या स्मरणात राहील. प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा उपयोग कसा करायचा, या दृष्टीने पुढील काळात पावले टाकली जातील, असा विश्वासही पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Madha Constituency Sharad Pawar NCP Politics