Loksabha 2019 : भाजपचा ‘सुजय’

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजमध्ये प्रवेश केला. त्या वेळी रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन.
मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजमध्ये प्रवेश केला. त्या वेळी रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन.

मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मंत्री, पदाधिकारी तसेच विखे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे यांच्या भाजपप्रवेशाने नगर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

या प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तसेच आघाडीच्या जागा अदलाबदलीवरही परिणाम होऊ शकतो. सुजय यांना नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जाते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला.

त्यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. डॉ. सुजय विखे-पाटील यांची नगर लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस करणार असून, त्याला केंद्रीय निवडणूक समितीकडून हिरवा कंदील मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

‘नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून येईल. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो,’’ अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी या वेळी व्यक्त केली. घरच्यांच्या विरोधात जाऊन भाजपप्रवेशाचा निर्णय घ्यावा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी नगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भाजपचा विजय असो’ अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे या वेळी सांगितले. काँग्रेसला नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. त्यानंतर सुजय हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजपच्या संपर्कात होते. सुजय यांना भाजपात प्रवेश देण्यास भाजपच्या काही आमदारांचा विरोध होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला २४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत ४५ जागा युतीला मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

विखे यांच्या भूमिकेकडे लक्ष!
आपण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आगामी काळात काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का? याचबरोबर काँग्रेस पक्ष विखे-पाटील यांच्याबाबत कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष वेधले जात आहे.

दिलीप गांधी यांची भूमिका काय?
भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी पक्षांतर्गत दबाव आणत सुजय विखे यांचा भाजपप्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे गांधी यापुढे कोणती भूमिका घेणार आहेत? ते बंडाचे निशाण फडकावणार का? याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com