Loksabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन

Helpline
Helpline

मुंबई - लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘१९५०’ ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइनअंतर्गत मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे.

चोवीस तास सुरू असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यांत कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जात आहे. आचारसंहिता लागल्याच्या दिवसापासून या हेल्पलाइनवर लोकांकडून दररोज विचारणा केली जात आहे. यात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. या हेल्पलाइनमुळे मतदार नावनोंदणीसाठी अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील मतदाराच्या वैयक्तिक माहितीचे तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाईल ॲप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येत असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हेल्पलाइनची वैशिष्ट्ये
    नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती देणे
    नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन
    मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नावनोंदणीसाठी मार्गदर्शन
    मतदान ओळखपत्र व मतदार अर्जाशी निगडित सर्व माहिती उपलब्ध
    मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती
    निवडणूकसंदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार 
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com