पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादीचा फॉर्म्युला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

‘एक बूथ, दहा यूथ’सोबत ‘हजारी प्रमुख’
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या जोमाने पक्षबांधणीची सुरवात केली आहे. पक्षाच्या युवक काँग्रेसने यासाठी राज्यभरात नव्या शाखा उघडण्यासाठी कंबर कसली असून, ‘एक बूथ, दहा यूथ’ हा प्रयोग अमलात आणला आहे. 

भाजपच्या ‘पन्नाप्रमुख’ या नीतीवरही राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हजारी प्रमुख’ ही संकल्पना राबवण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक बूथवरील एक हजार मतदारांमागे स्थानिक पदाधिकाऱ्यांची टीम तयार करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा डेटा जमा करण्यात आला असून, त्यानुसार पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारेचा प्रसार-प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे. 

हा सगळा कार्यक्रम एका ॲपवरून अमलात आणला जाणार आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर करून पक्षसंघटना बांधण्यावर पक्षाचा भर आहे.

Web Title: loksabha vidhansabha election NCP Politics