प्रेमासाठी वाट्टेल ते...कोट्यवधींच्या संपतीवर सोडले पाणी

सतीश निकुंभ
गुरुवार, 18 जुलै 2019

टीव्ही व मोबाईलमुळे तरुण पिढीला आपण काय करीत आहोत, याचे भान राहत नाही. अनेक कुटुंबाला आपल्या भावी पिढीपासूनच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महिलावर्गाने अधिकच सजग राहण्याची गरज आहे. 
- विलास जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर

नाशिक - आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, रुढी, प्रथा, चालिरीतीविरोधात संघर्ष करून एकत्र आलेले प्रेमीयुगुल आपण चित्रपटांतून नेहमीच बघतो. तसाच अनुभव नाशिकच्या पिंपळगाव बहुला भागातील प्रेमीयुगलांबाबत आला.

घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी पळून जाऊन लग्न केले. दोघांच्या नावावर असलेल्या कोट्यवधी रुपयांचा प्रश्‍न उभा ठाकला तेव्हा या युगुलाने ‘प्रेमासाठी वाटेल ते..’ असे दाखवत हक्क सोडपत्र लिहून देत संपत्तीवर पाणी सोडले.

पिंपळगाव बहुला या गावात नागरे व बाहुले ही प्रतिष्ठित व सधन कुटुंबे राहतात. एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या या कुटुंबांतील तिचे आणि त्याचे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान प्रेम जमले, जवळीक वाढली आणि घरच्यांचा विरोध डावलून पळून जाऊन लग्नही केले. त्यासाठी दोघांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीवर हक्क सोडपत्र लिहून देत पाणी सोडले आणि नव्या वळणावरील संसार थाटण्यासाठी हे दोघे घराबाहेर पडले. 

संरक्षणाची मागणी
सज्ञान असलेल्या या युगुलाने लग्नानंतर थेट सातपूर पोलिस ठाणे गाठले आणि आम्हाला आमच्या कुटुंबापासून जिवाला धोका असल्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलिसांकडे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Marriage Property Life