कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

LPG Cylinder Shortage : युद्धामुळे एलपीजी गॅस तुटवडा निर्माण झाला असून राज्यात अनेक ठिकाणी गॅससाठी लोकांनी गर्दी केली आहे. मुंबईत ४ ते ५ किमीपर्यंत ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत.
LPG Cylinder Shortage

CM Fadnavis on LPG Cylinder Shortage Sparks Long Queues

Esakal

Updated on

Gas Crisis Reported in Mumbai and Pune: आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानं भारतात अनेक ठिकाणी गॅसची टंचाई निर्माण झालीय. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आलीय. अनेक ठिकाणी हॉटेलने त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये बदल करून जास्त गॅस लागणाऱ्या पदार्थांना वगळलंय. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी घरगुती गॅस सिलिंडरसाठी रांगा लावल्या आहेत. पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये गॅस वितरण केंद्रासमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नवी मुंबईत गॅसच्या रांगा ४ ते ५ किमीपर्यंत पोहोचल्या आहेत तर पुण्यात पहाटेपासून ग्राहक रांगेत उभा आहेत. गॅस टंचाईमुळे काळ्याबाजारात गॅसचे दरही प्रचंड वाढले आहेत. एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com