कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या नांदणी जैन मठातील ३३-३७ वर्षे जुन्या 'माधुरी' हत्तिणीवरून आता वाद सुरू झाला आहे. जिला स्थानिक लोक 'महादेवी' म्हणतात आणि श्रद्धेचे प्रतीक मानतात. ही हत्तिणी नुकतीच गुजरातमधील जामनगर येथील वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्रात पाठवण्यात आली आहे. वनतारा हा अनंत अंबानींचा प्रकल्प आहे. यावर आता राजकारण तापलं आहे. यात आता एक रीलस्टारने खळबळजनक दावा केला आहे. यामुळे चर्चा होत आहे.