समतोल साधताना आघाडीची कसरत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्रातील मातब्बर
पश्‍चिम महाराष्ट्रातून संभाव्य मंत्री म्हणून शिवसेनेचे अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, विश्‍वजित कदम, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, बाळासाहेब थोरात; तर राष्ट्रवादीतून बबन शिंदे, जयंत पाटील, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी जयंत पाटील, थोरात यांचा शपथविधी झाला आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले 
आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahaaghadi politics