Mahabaleshwar Accident : आणखी एक भीषण अपघात; कामगारांना घेऊन जाणार टेप्पो दरीत कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Mahabaleshwar Accident : आणखी एक भीषण अपघात; कामगारांना घेऊन जाणार टेप्पो दरीत कोसळला

सातारा - सातारा जिल्ह्यात मोठा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. कालच मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकाच्या बसला अपघात झाला होता. त्यातच आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळून मोठा भीषण अपघात झाला आहे.

हेही वाचा: Saudi Arabia Citizenship : सौदी अरेबियाने बदलले नागरिकत्वाचे नियम; लाखो भारतीय कामगारांना...

महाबळेश्वर जवळ तापोळा रस्त्यावर असलेल्या मुगदेव घाटात हा टॅम्पो दरीत कोसळला. या टँम्पोत जवळपास ३० मजुर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवले असून प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करत आहे. जखमींमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेसह लहान मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा: Pankaja Munde : 'कुठल्या घोड्यावर बसल्यानंतर फायदा होईल, हे आधी ठरवावं'; पंकजा मुंडेंना चव्हाणांचा खास सल्ला

दरम्यान हा अपघात कसा घडला याबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच हे कामगार कामाच्या शोधात निघाले होते की, कंत्राटदार त्यांना घेऊन जात होते, हेही स्पष्ट झालं नाही. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. मात्र या अपघातामुळे मजुरांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता, मजुरांची वाहतूक करण्यासाठी बस, कार, किंवा रिक्षा असायला हवी. मात्र टेम्पोमध्ये अशी वाहतूक कसकाय करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :accidentMahabaleshwar