पूरग्रस्तांना सरकारी मदत प्राप्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahad flood

पूरग्रस्तांना सरकारी मदत प्राप्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाड : २२ जुलैला महाडमध्ये (mahad) आलेल्या महापुरामुळे (Flood) नागरिक, व्यापारी, शेतकरी आदींचे मोठे नुकसान (farmers loss) झाले होते. त्यांना सरकारकडून (mva Government) ३७ कोटी रुपयांची आर्थिक मदत (Financial help) देण्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू झाल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. पुरानंतर दीड महिन्यानंतरही मदत मिळाली नसल्याने पूरग्रस्त चिंतेत होते.

हेही वाचा: डोंबिवली : नगरसेवकांच्याच निष्काळजी पणामुळे दिवा शीळ रस्त्याची वाट


अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. महाड शहर आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना त्याचा तडाखा बसला होता. शहरात पुराची पातळी मोठ्या प्रमाणात असल्याने येथील व्यापारी लहान-मोठे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागाने शहरातील नागरिक, व्यापारी, कारागीर, पूर्णतः व अंशतः नुकसान झालेले नागरिक, शेती नुकसान अशा प्रकारे विविध पंचनामे केले होते.

त्यानंतर सरकारकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या नुकसानीपोटी दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यापैकी काही नागरिकांना या मदतीचे वाटप झाले होते; तर उर्वरित सुमारे दोन हजार नागरिकांना निधीअभावी पाच हजाराचे वाटप करण्यात आले होते; परंतु घरांचे नुकसान झालेले कुटुंब लहान मोठे व्यापारी कारागीर जनावरांचे नुकसान झालेले शेतकरी व शेतीचे नुकसान याबाबतचा निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे ते चिंतेत होते. अखेर सुमारे ३७ कोटी रुपयांचा निधी महाड महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर ही रक्कम देण्यात येत आहे.

हेही वाचा: पर्यटनात पहिले स्थान मिळवण्याची महाराष्ट्राची क्षमता- संतोष मंडलेचा

- महाड सात हजार १४४ कुटुंब मदत
- लहान मोठ्या ३६०० व्यापाऱ्यांना मदत
- शेतजमिनीच्या नुकसानीचेही वाटप
- पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

"महाड तालुक्यातील पूरग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत वाटप करण्यात येत आहे. या मदतीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे."

- अरविंद घेमुड, नायब तहसीलदार, महाड

अशी आहे नुकसानभरपाई


दुकानदार : २२ कोटी १९ लाख

कारागीर : ३० लाख १४ हजार

शेतजमीन : १ कोटी ५६ लाख ८६ हजार

मृत जनावरे : २ कोटी ११ लाख ६७ हजार

अन्नधान्य नुकसान : ४ कोटी ४१ लाख

घरांचे नुकसान : ५ कोटी २७ लाख

loading image
go to top