माढ्यातून शरद पवारांविरोधात महादेव जानकर?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

'भाजपने जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल,' असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर पवारांना थेट जानकरांनी आव्हान दिले आहे. 'मी बारामती आणि माढा येथे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे,' असेही महादेव जानकरांनी सांगितले.

लोकसभा 2019 ः माढाः 'भाजपने जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल,' असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर पवारांना थेट जानकरांनी आव्हान दिले आहे. 'मी बारामती आणि माढा येथे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे,' असेही महादेव जानकरांनी सांगितले.

'बारामतीत कमळ फुलणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरीही आम्ही पाच मिनिटांच्या मुलाखतीत मतदार संघ आम्हाला मिळवू. सीएम आमचं म्हणणं ऐकतील याची मला खात्री आहे,' असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, देशाच्या राजकारणात अनेक लाट्या आल्या पण पवारांनी आपला हा गड अभेद्य ठेवला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात सहानुभूतीची लाट असाताना शरद पवार यांनी राजीव गांधींच्या पक्षाच्या विरोधात लढूनही बारामतीत मात्र पवारांनी ही लाट थोपवत विजय मिळवला होता. 2014 साली झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीतही देशाने एक मोठी लाट पाहिली. तेव्हाही नरेंद्र मोदी यांना देशभर चांगलाच प्रतिसाद मिळत होता. पण बारामतीकरांनी याही लाटेत राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देत सुप्रिया सुळेंच्या पारड्यात मत टाकले. आता महादेव जानकर शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा लढल्यास निकाल काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: mahadev jankar Contest Loksabha Against Sharad Pawar In Madha