जानकरांनी भाजपला नमवले; रासपकडूनच विधानपरिषदेत 

सोमवार, 9 जुलै 2018

भाजपच्या पाच उमेदवारांच्या यादीत जानकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, जानकर यांनी भाजपची उमेदवारी स्विकारण्यास नकार दिला. पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही जानकर नमले नाहीत.

नागपूर : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत असताना भाजपच्या दबावाला बळी न पडता महादेव जानकर यांनी स्वपक्षाची उमेदवारी कायम राखण्यात यश मिळवले आहे.

भाजपच्या पाच उमेदवारांच्या यादीत जानकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, जानकर यांनी भाजपची उमेदवारी स्विकारण्यास नकार दिला. पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही जानकर नमले नाहीत. त्यांनी विद्यमान भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. जानकरांच्या या पवित्र्यामुळे भाजपने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज दाखल करून जानकर यांच्याकडे माघार किंवा पराभव असा पर्याय ठेवला होता. पण जानकर यांनी अखेरपर्यंत भाजपच्या दबावाला बळी न पडता स्वपक्षाची उमेदवारी कायम ठेवली.

अखेर सहयोगी पक्षाला नाराज करणं भाजपाला अडचणीचे ठरणार असल्याने स्वपक्षाचे पृथ्वीराज देशमुख यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली. 

Web Title: Mahadev Jankar files nomination for legislative council election