‘जानकर हट्टा’मुळे भाजपची पंचाईत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हट्ट धरल्याने भाजपच्या नेत्यांची विधिमंडळ परिसरात काहीवेळ चांगलीच पंचाईत झाली होती. अखेर दिल्लीहून सूत्रे हलवावी लागली व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंजुरी दिल्यानंतर जानकर यांना ‘रासप’कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. 

विधान परिषदेसाठी भाजपचे पाच सदस्य निवडून येतात. यासाठी भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांची यादी आली. यात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भाजपचे उमेदवार दाखविले होते. भाजपच्या चार जणांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु महादेव जानकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल करण्यास नकार दिला व राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली. अगदी शेवटच्या टप्प्यात हा प्रश्‍न उपस्थित झाल्याने दिल्लीत फोनाफोनी सुरू झाली. अखेर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी जानकर यांना ‘रासप’कडून अर्ज दाखल करू द्या, असा निर्णय दिल्याने भाजपच्या नेत्यांच्या जिवात जीव आला. 

Web Title: mahadev jankar Rasp candidate