

Mahadev Munde : बीडमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत. तिसऱ्यांदा तपास अधिकारी बदलल्यानं आता सरकारचं नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाबरोबर महादेव मुंडे खून प्रकरणाचा विषय सातत्यानं लावून धरला होता.