
कोल्हापूरकरांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून आता महादेवी हत्तीण वनतारातून परत येणार आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी आणि अंबानी परिवाराचे आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.