पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपकडून महामृत्यूंजय मंत्रजाप | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Addhyatmik Samanvay Aghadi

पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपकडून महामृत्यूंजय मंत्रजाप

नाशिक : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींवरुन आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय पथकाने फिरोजपूरला भेट दिली. दुसरीकडे मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी देशातील मंदिरांमध्ये महापूजा करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) येथील रामकुंडावरील बाणेश्वर महादेव मंदिरात भाजप (BJP) आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज शुक्रवारी (ता.सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप करण्यात आला.(Mahamritunjay Manta Jap For Long Life Of PM Narendra Modi In Nashik)

हेही वाचा: केंद्रीय मंत्र्यांचा असाही साधेपणा; भररस्त्यात गाडी थांबवून दानवेंनी साधला गावकऱ्यांशी 'संवाद'

यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Archarya Tushar Bhosale) यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. हरियाणातील पंचकुलाच्या मनसा देवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायूसाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हवन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top