हेडमास्तर कुठे हरवले? भाजप नेत्यावर कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या|Chitra Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh Letter to Home Minister

भाजप नेत्यांवरील कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अर्धांगिनी रश्मी ठाकरेवर (Rashmi Thackeray) आक्षेपार्ह टीप्पणी केल्याप्रकरणी जितेन गजारियावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wsgh) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांना पत्र लिहून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Minister Dilip Walse Patil) यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला असता. विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण 'हेडमास्तर’सारखी भूमिका बजावली. पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री, रश्‍मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्‌विट भाजपच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी जितेन गजरियाविरुद्ध गुन्हा दाखल

''जितेन गजारिया यांच्या भाषेचं समर्थन करता येणार नाही. महिलाबाबत अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई कारयलाच हवी यात दुमत नाही. पण, मग संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आक्षेपार्ह वक्तव्य पोहोचले. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलंय?'' असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

''कारवाईसाठी किती वळसे घेणार?''

''गुलाबराव पाटील यांनी महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरला होता. ते महिला लोकप्रतिनिधींची मानहानी करणारे नाही का? मग गुलाबराव पाटलांवर अद्याप कारवाई का केली नाही? गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे, तर मग तो आपल्या वर्तवणुकीतून दिसत का नाही? गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातलं जातयं. कारवाई करण्यासाठी आणखी किती दिवस वळसे घेणार आहात? हेच आहे का महाविकास आघाडीचे शिवशाहीर सरकार?'' असा घणाघात देखील वाघ यांनी केला आहे.

''मुळात गृहमंत्री म्हणून आपलं काही चालतंय का? सबळ पुरावे असताना कारवाई करत नाही. एवढी हतबलता का आहे? गृहमंत्रालय नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय. जर जितेन हजारिया दोषी असेल तर राऊत आणि गुलाबराव पाटीलही दोषी आहेत. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्या तत्काळ गुन्हा दाखल करा'', अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chitra Wagh
loading image
go to top