
Holiday on 6th December Marathi News : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. पण ही सुट्टी केवळ मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठीच लागू असणार आहे.