
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी १०७ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट इशारा दिलाय. १०७ लोक जे बेपत्ता आहेत ते कुठं लपले असतील त्यांना पोलीस शोधून जिथं सापडतील तिथंच ठोकतील असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.