Maharashtra Gets 12 New IPS Officers
esakal
महाराष्ट्राला आता १२ नवे IPS अधिकारी मिळणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला असून, ३१ ऑगस्टपासून हे परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र संवर्गात रुजू होणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर या अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच SDPO म्हणून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या १२ अधिकाऱ्यांमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.