महाराष्ट्रात 23 टक्के लोकांना मधुमेहाचा धोका - डॉ. ठाणेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - इन्शुलिनचे जनक फ्रेड्रिक बॅंटिंग यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेहाचे देशात वाढणारे प्रमाण, दुष्परिणाम आदींबद्दल समाज जागृती व्हावी, याकरिता आम्हीही प्रयत्न करत आहोत, असे डॉ. एम. एन. ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. ठाणेकर म्हणाले, 'भारतात सहा कोटी 80 लाख लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. सात कोटी 42 लाख लोक प्रिडायबेटिक (मधुमेहाचा धोका भविष्यात उद्‌भवू शकतो असे) आहेत. महाराष्ट्रात साधारण 60 लाखांपेक्षा अधिक लोक हे मधुमेहग्रस्त असून 92 लाख लोक प्रिडायबेटिक आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 23 टक्के लोकांना मधुमेहाचा धोका आहे. आज कोल्हापूरची लोकसंख्या अंदाजे पाच लाख मानली तर 25 टक्के लोक म्हणजे साधारण एक लाख लोक हे मधुमेही किंवा मधुमेहाच्या धोक्‍याखाली वावरत आहेत. मधुमेहामुळे हृदयरोग, मूत्रपिंड विकार, पायांचे ऍम्प्युटेशन, अंधत्व आदींचे प्रमाण वेगाने वाढत असून या गोष्टी टाळण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवण्याकरिता रुग्णांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असतो.''

ते म्हणाले, 'मलेरिया, टीबी औषधाने कायमचे बरे होतात; पण मधुमेह हा आजार कायमचा बरा होत नाही. तो आहार, व्यायाम, मानसिक समाधान, औषधे आदींतून नियंत्रणात ठेवता येतो. याकरिता रुग्ण, नातेवाइकांना मधुमेहाबद्दल माहिती असावी लागते. भारतीय लोकांत वजन, लठ्ठपणा, बदलती जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीनंतरही हा धोका उद्‌भवल्याचे दिसते. 50 टक्के मधुमेही रुग्णांत वजन जास्त असणे, लठ्ठपणा आदी लक्षणे दिसतात.''

Web Title: Maharashtra 23 percent of people at risk of diabetes