ट्रॅक्टर विक्रीत महाराष्ट्र तिसरा : खरेदी करताना तपासा या बाबी

यूपी, राजस्थान, महाराष्ट्र व कर्नाटकाचा विक्रीत ५७ टक्के वाटा
Maharashtra 3rd in Tractor Sale
Maharashtra 3rd in Tractor Sale

पुणे : शेतकऱ्यांचे दरडोर्इ कमी होत असलेले क्षेत्र... शेती पिकविण्यासाठी वाढलेला खर्च... जनावरांचा सांभाळ करण्यात येत असलेल्या अडचणी... यामुळे शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा सांभाळ करणे अवघड होत आहे. तसेच, शेती करण्याच्या बदलेल्या पद्धतीमुळे यांत्रिकीकरण वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ट्रॅक्टरची मागणी वाढतच आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टरची मागणी ३१ टक्क्यांनी कमी झाली आहे.

ट्रॅक्टर विक्रीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याने राज्यातही यांत्रिक शेतीचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा देशातील एकूण ट्रॅक्टर विक्रीत ५७ टक्के वाटा आहे. राजस्थान येथील डिजिटल मार्केटप्लेस स्टार्टअप ट्रॅक्टर जंक्शनने केलेल्या सर्व्हेत या बाबी समोर आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात देशात ४९ हजार १९६ युनिटची विक्री झाली. कोरोनाचा शेतीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा विक्री कमी झाली आहे.

ट्रॅक्टर विक्री

  • राज्य ऑगस्ट २१ ऑगस्ट २२

  • उत्तर प्रदेश १,११० ९,०८१

  • राजस्थान ७,७२१ ८,२११

  • महाराष्ट्र १०,९५५ ६,६०९

  • कर्नाटक ५,४०१ ४,०९९

  • गुजरात १५,०१९ ३,४७७

  • हरियाना ३,७६७ ३,३८८

  • बिहार ३,३३८ ३,३७८

  • तमिळनाडू २,६७८ २,२५४

  • पंजाब २,३४४ १,८१९

  • छत्तीसगड २,४६९ १,७३७

सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

  • विक्रीबाबत राज्याचे तिसरे स्थान कायम

  • गुजरातमधील विक्री १५ वरून तीन हजारांवर

  • राजस्थानमधील विक्री ४९० ने वाढली

  • बड्या कंपन्यांच्या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची पसंती कायम

  • परदेशी कंपन्यांच्या ट्रॅक्टरची विक्रीही वाढली

ट्रॅक्टर खरेदी करताना या बाबी तपासा

  • आपण घेत असलेल्या ट्रॅक्टर किती ‘एचपी’चा आहे

  • शेतीसह कोणती कामे आपण त्या माध्यमातून करणार आहोत

  • आपण निवडलेल्या ट्रॅक्टरच्या देखभाल-दुरुस्तीची सोय जवळपास उपलब्ध आहे का

  • सुटे भाग (स्पेअर पार्ट) बाजारात सहज व स्वस्त उपलब्ध आहेत, याची खातरजमा करावी

  • भविष्यात कोणती यंत्र ट्रॅक्टरला जोडायची आहेत

  • ट्रॅक्टरच्या ताकदीसोबतच इंधनाचा होणारा वापरही पाहणे गरजेचे असते.

यंदाच्या असमान पावसामुळे ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज कृषी क्षेत्र, ट्रॅक्टरचे प्रमाण आणि इतर शेती उपकरणांसाठी चांगला आहे. सणासुदीच्या हंगामासह वर्षाच्या उर्वरित महिन्यात विक्री पुन्हा वाढविण्यास मदत करेल.’’

- रजत गुप्ता, संस्थापक, ट्रॅक्टर जंक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com